नव वर्षाचे स्वागत


नव वर्षाचे स्वागत

करु स्वागता नव वर्षांला
नवी उभारी देऊ मनाला
विसरुन जाऊ दु:खाचे क्षण
हेच खरे प्रगतीचे लक्षण

नव वर्षाची नवी आव्हाने
पेलून घेऊ दोन्ही कराने
करुया पुन:श्च साीमोलंघन
नव्या दिशा अन् नव आंदोलन

तारुण्याच्या उल्हासाला
अनुभवाची व्हावी साथ
चला उठारे चला करुया
दाही दिशा पादाक्रांत

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

⁃ शशांक पुरंदरे

Comments

👌👌👌🙏

By : Sheela Bahadkar
09/04/2024 09 : 45 : 46 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article