मला अशा गोष्टीचा खूप त्रास हो ....
मला अशा गोष्टीचा खूप त्रास हो ....
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपण एखाद्या मित्राला वेगवेगळ्या वेळी फोन करतो आणि तरीदेखील तो फोन घेत नाही, आणि जेव्हा तो फोन करतो तेव्हा पहिल्या रिंग मध्ये आपण तो घ्यावा अशी अपेक्षा ठेवतो.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपण उत्साहाने मित्राला भेटायला जातो आणि तो म्हणतो, बस जरा, मी आलोच दहा मिनिटांत आंघोळ करून!
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपण उत्साहाने मित्राला भेटायला जातो आणि तो आपल्याला समोर बसवून फोनवर अर्धा तास बोलत राहतो.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपण मित्राला दहा वेळा मिस्ड कॉल देउनही तो म्हणतो की तू मला कधी फोन केला होतास?
एकंदरीतच मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपला फोन बघूनही काही जण कॉल रिटर्न करत नाहीत.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा बरोबर दुपारी तीन वाजता आपल्या वामकुक्षीच्या वेळी टेलीमार्केटिंगवाले फोन करतात.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपण एखादा फोन नंबर ब्लॉक करतो तेव्हा तो माणूस दुसऱ्या नंबरवरून परत फोन करतो.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपण एखादी गोष्ट ऑनलाईन मागवतो आणि डिलीव्हरीवाला शेजारच्याची बेल वाजवून घरी कुणी नाही म्हणून वॅाचमनला वस्तू देऊन जातो.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा एखादा माणूस तुमच्या घरी येतो आणि संपूर्ण वेळ स्वत:विषयीच बोलत राहतो.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा एखादा माणूस अर्धा तास तुमच्या समोर बसून एक शब्दही बोलत नाही.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा बस स्टॅापवर अर्धा तास उभे राहून एकही बस येत नाही, मात्र तेव्हढ्या वेळात विरुध्द दिशेने चार पाच बसेस जातात.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपल्याला हवी असेल तेव्हा एकही रिक्षा मिळत नाही पण इतर वेळी पाचसहा रिक्षा रागेत उभ्या असतात.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा टोलची आपली रांग हलत नाही, पण बाजूची वाहने झपाझप जात राहतात.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा एखादा माणूस दिलेली वेळ पाळत नाही.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा एखादा पाल्य खूप हुशार असतो पण पालक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा आपण टीव्हीवर काहीतरी इंटरेस्टिंग पहात असतो आणि फोनवर फोन येत राहतात.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो जेव्हा खूप भूक लागलेली असते पण खायला काहीच इंटरेस्टिंग नसते.
मला अशा गोष्टीचा खूप त्रास होतो अश्या अजूनही खूप गोष्टी आहेत पण त्या सांगून मी तुम्हाला अजून का त्रास देऊ???



Comments
Absolutely
By : Mona
Absolutely right
By : mona
हो मला पण अशा गोष्टींचा त्रास होतो की आपल्या मित्राच्या ग्रुप वर आपण पाठवलेला मेसेज/ पोस्ट न वाचता परत तोच मेसेज त्याच ग्रुप वर दुसरंच कुणीतरी फॉरवर्ड करत
By : सौमंजुषा गवळी
अरे तुझ्या अपेक्षा चा डोंगर फ़ार ऊंच आहें म्हणून तुला या सर्व गोष्टींचा त्रास होतो . खरं तर तू त्रास करून घेतोस .नाहीतर कुणी त्रास देवूच शकत नाही तुझ्या परवानगी शिवाय
By : चित्रे मोहिनी
त्रास होणाऱ्या गोष्टींची यादी करण्यापेक्षा कशात आनंद मिळतो त्याची यादी कर.मग बघ कशी मज्जा वाटेल ते!
By : Pratibha Tarabadkar