माझा स्तंभ ०२-०३-२०२४


माझा स्तंभ ०२-०३-२०२४ सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लगले आहेत. सत्ताधारी नवीन प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या मागे आहेत. विरोधी पक्ष त्यांना विरोध करण्यसाठी विरोध करण्याच्या मागे आहेत. लवकरच सार्वजनिक सभांचा सपाटा सुरु होईल. अनेक आश्वासने दिली जातील. निवडणुका झाल्यावर सर्व आश्वासने हवेत विरतील. मतांसाठी सर्व तर्हेच्या लाचांचे प्रलोभन दिले जाईल.

मला एक गोष्ट कधीच समजली नही. आपण सर्व जण एव्हढे दुधखुळे आहोत का की दोन चार सभांमधील भाषणे ऐकून आपले मतपरिवर्तन होईल? या सर्व नेत्यांना असे का वाटते हे मला समजत नाही. हा पैशांचा आणि वेळेचा अपव्यय आहे.

दुसरा मूर्खपणा म्हणजे आचारसंहिता! गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचे क्रेडीट सत्ताधारी घेणारच! त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. एकदा बजेट संसदेत मान्य झाल्यावर नवीन प्रोजेक्ट्स येऊ शकत नाहीत. आश्वासने तर सर्वच देतात. मग आचारसंहिता कशासाठी?? हे नियम बदलले पाहिजेत.

पक्षांतर विरोधी कायदा हा एक विनोद आहे. हा कायदा पक्षांतर सुकर करण्यासाठीच केला आहे असे मला वाटते. हे बदलले पाहिजे. निवडणुकीपूर्वीची युती नंतर तोडली तर त्या पक्षालाच निलंबित करण्याचा कायदा आला पाहिजे. नाहीतर पक्ष मतदारांना नंतर किंमत देत नाही असाच याचा अर्थ आहे. एकदा निवडून आल्यावर नेत्यांवर अंकुश ठेवण्याचा उपाय मतदारांकडे रहात नाही. अशा लोकशाहीला काहीही अर्थ नाही.

पण मी वर नमूद केलेल्या कुठल्याही गोष्टी राजकीय पक्ष होऊन देणार नाहीत. कारण यात त्यांचेच नुकसान आहे. त्यामुळे हे कसे करता येईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे,.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांनाच फक्त आरक्षणाची गरज आहे. पण अर्थातच असे करणे म्हणजे राजकीय आत्महत्या आहे. त्यामुळे हे होणे नाही. तेंव्हा मंडळी, विचार करा!

अवकाळी पाउस झाला की नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे. मी दुचाकीवरून पडलो किंवा घराचे छप्पर उडाले तर भरपाई मिळेल का??

जिम कॉर्बेटचे कुठलेही पुस्तक उचलून वाचणे यासारखा दुसरा विरंगुळा नाही. अगदी स्वत: जंगलात जाऊन राहिल्या सारखे वाटते. याच संदर्भात कालच अमेझोनवर पोचर नावाची मालिका पहिली. बघून मन विषण्ण झाले. आपल्या फायद्यासाठी माणूस हिंस्त्र श्वापदासारखा वागू शकतो ही खरोखर चिंतेची बाब आहे. या पोचर्सना राजकीय संरक्षण मिळते. इतके अत्त्याचार करून वीरप्पन सारखा माणूस शेवटी मारला गेला पण त्याला राजाश्रय देणारे अजूनही मोकाटच आहेत. म्हणतात ना, रात गई बात गई, हे तसेच आहे.

नीता अंबानी साडेपाच लाखाच्या सोन्याच्या कपात चहा पिते. त्यांच्या मुलांच्या लग्नाला सर्व जग लोटते. जेवणात २५०० पदार्थ बनवायला २५० शेफ असतात. सामान्या माणूस आयुष्यची सर्व कमाई त्याच्या लेकीच्या लग्नात घालवतो. आणि एव्हढे करून हुंडा कमी दिला म्हणून सासरची माणसे तिचा जीव घ्यायला देखील मागेपुढे बघत नाहीत.

मुलांना चांगले शिकवून सक्षम बनवणे आईवडीलांच्या हातात असते. पण आईवडीलांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळच नसतो. त्यांना हवे तेव्हढे एक्स्पोजर मिळत नाही. हल्ली शिक्षणाची समीकरणे बदलालीआहेत. पारंपारिक शिक्षण पुरेसे नाही हे पालकांनी आत्ताच ओळखून त्याप्रमाणे पावले उचलणे गरजेचे आहे. पण लक्षात कोण घेतो?

हल्लीची बारा तेरा वर्षांची मुले "वजनदार" असतात. कारण फास्ट फुड! घरी स्वयंपाक करायला वेळ आहे कुणाला? पण लक्षात कोण घेतो?

अशा वागण्याने आपण स्वत:चे आणि आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान करत आहोत. पण लक्षात कोण घेतो.

Comments

Excellent write up and thought provoking. Kudos Sir.

By : Cyril David
07/03/2024 9 : 11 : 07 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article