काही बोलायाचे आहे …..!
काही बोलायाचे आहे …..!
शशांक पुरंदरे
परवाच एका मैत्रिणी बरोबर आम्ही, म्हणजे मी व माझी पत्नी गप्पा मारत होतो. मुलींचे वय उघड करणे योग्य नाही पण एव्हढेच म्हणेन की माझ्यापेक्षा बरीच लहान आहे.
चहा पीत आम्ही बाहेर जमा झालेले पण न बरसणारे जलमेघ पहात होतो. तिने माझ्या फ्रेंचविंडो मधून दिसणाऱ्या देखाव्याची छबी आपल्या भ्रमणध्वनीत कैद केली.
मी म्हणालो पावसात निदान टिकूजी नी वाडी पर्यंत तरी भिजायला जायला हवे. माझी पत्नी म्हणाली एकदा ती फिरायला गेली होती तेव्हा मस्त पाऊस पडत होता. मी विंडचीटर घालून छान पावसाचा आनंद लुटला. मी म्हणालो की पावसात भिजायचेच असेल तर विंडचीटर कशाला?
त्यावर माझ्या मैत्रीणीच्या उत्तराने माझे डोळे खाडकन उघडले. ती म्हणाली की आम्ही विंडचीटर घातला नाही तर मंदाकिनी होतो!!!!
या उद्गारातच आपला समाज आज कुठे चालला आहे हे समजते. बऱ्याच वेळेला आपण स्त्रीयांना गृहित धरतो हेच खरं!
स्त्री ही उपभोगाची वस्तु आहे असा बहुतेक पुरुष जमातीचा समज आहे. कुठे काही दिसतंय का याचा वखवखलेल्या नजरांनी शोध घेणं काही थांबत नाही.
स्री-पुरुष आकर्षण हे नैसर्गिक आहे. निसर्गाने स्रीला सुंदर व आकर्षक बनविले आहे. त्याचा हेतू प्रजोत्पादनाशी निगडीत आहे.
पण आपण आज खूप पुढे निघून आलो आहोत. पुराणातील गंगेला वळविणाऱ्या भागिरथाची गादी आज मानव चालवत आहे. पण मग अशा काही बाबतीत अजुनही आपण का स्वतःला बदलत नाही? का स्रीयांना समाजात त्यांचे मानाचे स्थान अजुनही मिळत नाही?
सोशल मिडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी होईल अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र चित्र उलटेच आहे.
सुरुवात हिंदी सिनेमांपासून झाली. त्यातील सर्व गोष्टी लोकांना खऱ्या वाटू लागल्या. आता तर फेसबुक हे पॅार्नबुक झाले आहे. खरे, खोटे, मॅार्फ केलेले व्हिडीओ आणि फोटो आज धुमाकूळ घालत आहेत. अनेक प्रायव्हेट WhatsApp ग्रुप आहेत ज्यावर केवळ अशाच गोष्टींची देवाणघेवाण चालते. आज पौगंडावस्थेत असलेल्या तरुणतरुणींवर याचा काय परिणाम होतोय याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवा आहे. हे कुठेतरी थांबावयास हवे आहे.
Hope you guys are listening !!!



Comments
तुमची मैत्रीण हजरजबाबी दिसते....🤭 ही खरंतर समस्त स्त्री वर्गाची अडचण आहे, पण तिला गमती जमती मध्ये व्यक्त करणं अगदी सहज जमलं आहे...
By : Pradnya Gore
The serious topic is discussed in a light mode, at the same time the last line makes the huge impact....
By : Pradnya Gore