हवाई पहाणी
बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी आमच्या घराच्या मुख्यमंत्री (म्हणजे आमची ही) यांनी घराची हवाई (म्हणजे खाली न वाकता) पाहणी करुन नुकसानीचे आढावा घेतला.
यावेळेस वरिष्ठ अधिकारी (म्हणजे मी) देखील उपस्थित होते.
पहाणीमध्ये घरात उडालेली प्रचंड धूळमाती व फुटलेल्या कपांचे अवशेष आढळून आले.
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना ताबडतोब स्वच्छता करण्याचे आदेश देत त्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री (झाडू इत्यादी) उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. कामात कोणताही हलगर्जीपणा वा दिरंगाई चालवून घेतली जाणार नाही असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिला. यामुळे सामान्य जनतेचे ( म्हणजे माझेच) कुठलेही नुकसान होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र जनतेला कुठलीही आर्थिक मदत देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. सरकारी तिजोरी (म्हणजे माझा पगार वगैरे) वर आधीपासूनच खूप भार ( दागदागिने, साडी, कॅास्मेटिक्स, हॉटेलिग) आहे व त्याची तरतूद आधीच केल्यामुळे आता आर्थिक टंचाई आहे असे त्यांनी नमूद केले.
या यशस्वी पहाणीनंतर मुख्यमंत्री चहापानाकरिता रवाना झाल्या.
कॅमेरामन (मीच) सह मीच ABC तुमचा.



Comments
We learnt macro economics (larger level) and micro economics (smaller level). Excellent application of macro level happening to micro level
By : Deepak Tikekar
वाह वा क्या बात है! प्रासंगिक आपत्तीचे सुंदर घरगुती करण ...
By : Bhalchandra Shrikhande
मिश्किल शैलीत सांगितलेली गंमत
By : Pratibha Tarabadkar