झुळुक


कविता कशी सुचते? अचानक वीज गेली, क्षणार्धात घामेजलो. तेव्हढ्यात कुठूनशी वाऱ्याची झुळूक आली आणि ओठावर शब्द उमटले,

झुळुक

कुठुनशी येई
थंड झुळूक वाऱ्याची
तापल्या तनूला मिळे
थंडाई हवीहवीशी

तप्त रवि ओकतो
अंगार अवकाशातूनी
हिरव्या चैत्रपालवीला
किनार जणू ग्रीष्मदीनी

पशुपक्षी होती मलूल
क्लांत दिशाहीन
शोधती निवारा आडोशाला
दिनचर्या जणू प्रतिदिन

आता प्रतीक्षा मेघांची
गरजणाऱ्या शाम घनांची
गरजत बरसत येतील
तृषा शांत करण्या धरणीची

⁃ शशांक

Comments

तप्त रवि ओकतो----किनार जणू ग्रीष्मदीनी ही उपमा खूप छान.👌👌

By : योगिनी लोथे
27/04/2024 11 : 32 : 12 AM

एका शास्त्रज्ञाला अशी कविता कशी सुचते

By : दीपक टिकेकर
27/04/2024 7 : 26 : 56 PM

👌👌👌

By : Sheela Bahadkar
28/04/2024 08 : 34 : 41 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article