पदचिन्हं
पदचिन्हं
शशांक पुरंदरे
त्या सांजवेळी
ओल्या वाळूवरी
रेखिले नाव माझे
घेऊनी हात करी
नयनांनी काही वदलो
वाचून चेहऱ्याला
कळले तुला मला ते
निशःब्द सांजप्रहरी
भाषा मनामनांची
कविता युगायुगांची
येई जन्मास तेथे
बेबंद धुंद लहरी
उमटून पावलांची
पदचिन्हं वाळूवरी
होती तिथे द्वयांची
भासली एक जरी



Comments
सुंदर रचना
By : Sandeep
खूप छान
By : अंजली
Mast
By : Prasad khare