शर्विलक


मालवले सर्व दीप
झोपलेत सर्व शांत
जाऊनी हळूच आत
चोरी करूया निवांत

त्या तिथे पहाऱ्यात
झोपलाय बघ निवांत
आवाज तू करू नकोस
चाल हळूच दबकत

गार गार या हवेत
झोपलाय बघ मस्त
उठला तर होईल रे
सर्व आपला प्लॅन फुस्स

त्या तिथे कोपऱ्यावर
गस्त पोलिसांची दूर
रे त्यांना कसे कळेल
मारू डल्ला जावू भुर्र

काय ही तुझीच शिंक
टाकलीस का तू पिंक
दरवळला सर्व वास
धुंद सर्व आसमंत

उठला तो पहारेकरी
घेऊनी दांडूका करी
चल धाव झडकरी
पळ आता दूरवरी

रे तुला कधी कळेल
हे तुला कधी गमेल
मावा खाणे नाही बरे
चोरी मग कशी फळेल

मालवले सर्व दीप
घरी जाऊ झोपू शांत
यत्न करू उद्या पुन:श्च
जर मावा नसे खिशात

कवि: नुसतेच भट

शशांक ( सुरेश भटांची क्षमा मागून )

Comments

😀🙂😉😉 तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम या शीर्षकाचा उपयोग करा, फिल्म्स division मधून एक डॉक्युमेंटरी बनवतील!

By : Bhalchandra Shrikhande
13/09/2023 6 : 16 : 44 PM

एकदम भारी.मला नावासकट पाठव.मी शेअर करते. त्या चालीत फिट्ट बसतेय.

By : Pratibha Tarabadkar
13/09/2023 6 : 36 : 25 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article