कवितांचे विद्यापीठ
कवितांचे विद्यापीठ
कवितांच्या विद्यापीठात
सादर केल्या कविता पन्नास
पण गुरुजी मारतात शेरा
म्हणतात, तू ना,पास!
कवितांच्या जंगलात
रथी महारथींचे वारु
आमचे मात्र आहे
वाट चुकलेले वासरु
शब्द नाही सापडत
नाही जुळत यमक
कविता म्हणते मला
कसा तोल सावरू?
वाट पाहतो आहे
कुठून येईल प्रेरणा?
तोवर मीच समजावतो,
जरा थांबरे मना!
कधीतरी गुरुजी म्हणतील
पाहून माझा अभ्यास
शाब्बास माझ्या राजा
तू झालास पास !!!!
शशांक



Comments
शब्द नाही सापडत नाही जुळत यमक कविता म्हणते मला शोध शब्द वेचक
By : Anagha
कवितेचं जंगल आवडलं
By : Sandeep V Nachane