मराठीची हास्यजत्रा
एक काळ होता जेव्हा मराठीला जयवंत दळवी, वि.आ. बुवा, आचार्य अत्रे आणि या सर्वांचे शिरोमणी आणि महाराष्ट्राचे दैवत पु. ल. देशपांडे यांसारखे मात्तबर विनोदी लेखक लाभले. यांचे लेखन अजूनही वाचक आवडीने वाचतात आणि पुनःप्रत्ययाचा अनुभव घेतात.
या नंतर द. मा. मिराजदार, वसंत सबनीस सारख्या लोकांनी मराठी विनोदी साहित्यात आपला ठसा उमटवला.गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेले आणि मच्छिंद्र कांबळींनी अजरामर केलेले वस्त्रहरण हा मराठी इतिहासांत मैलाचा दगड मानला जातो. व. पु.काळेंच्या विनोदाला कारूण्याची झालर होती.
त्यानंतर मात्र मराठी विनोदी लेखनाचा आलेख थोडासा उतरताच राहिला आहे. मघ्यंतरीच्या काळात आवाज, मोहिनी सारखे विनोदी दिवाळी अंक आवडीने वाचले जायचे. पण हळूहळू यांचाही दर्जा कमी झाल्यामुळे वाचकवर्गही कमी होत गेला.
मराठी सिनेमांच्या बाबतीत बोलायचे झाले तर लक्षीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. अशा ही बनवाबनवी हा विनोदी सिनेमांचा शिरोमणी आहे. नवरा माझा नवसाचा हा एक छान सिनेमा होता.
दाद कोंडके यांनी आपला वेगळा प्रेक्षकवर्ग केला. त्याच्या अभिनयाची नक्कल अजूनही केली जाते.
परंतु हल्ली विनोदी मराठी सिनेमे क्वचितच येतात आणि त्याच्या दर्जाबद्दल न बोललेलच बरं !
टीव्ही एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मराठी विनोदी मालिकांचा त्यात प्रवेश अपेक्षितच होता. अस्स माहेर नको ग बाई ही मालिका अफलातून होती. कोरोनामुळे ती बंद झाली.
आत्ता आलेली पोस्ट अॅाफिस उघडे आहे पण खूप छान होती. पण समीर चौघुलेंच्या ओव्हर अॅक्टिंगने थोडी मजा घालवली. वास्तविक ते खूप गुणी कलाकार आहेत. त्यांना ओव्हरअक्टिंगची गरज नाही.
महाराष्ट्राची हास्यजत्रा एक चांगला कार्यक्रम होता. सर्व कलाकार अतिशय चांगले आहेत. पण नंतर त्यात तोचतोच पणा येऊ लागलाय. बरे झाले टीमने दोन महिन्याचा विराम घेतला आहे. काहीतरी नवीन घेऊन येतील अशी अपेक्षा करुया.
प्रशांत दामले स्वतःच एक इंडस्ट्री आहेत. आत्तापर्यंत नाटकांचे बाराशे प्रयोग या माणसाने केले आहेत. गेला माधव कुणीकडे आणि एका लग्नाची गोष्ट दोन अफलातून नाटकं होती. परंतु नंतरच्या त्यांच्या नाटकांमधे नाविन्य नव्हते. एका लग्नाची पुढची गोष्ट अतिशय निराशाजनक होते. प्रशांत दामलेच्या थीम्सची अनेक लोक सध्या कॅापी करत आहेत. पण शेवटी लोकांना नवीन काहीतरी हवे असते, नाही का? झिजलेली रेकॅार्ड किती वेळा वाजवणार ?
मराठी विनोदी वेब सीरीजमधील जजेसना उगाचच हसण्यासाठी पैसे मिळतात असे माझे स्पष्ट मत आहे.
शेवटी नवीन दमाचे चांगले विनोदी लेखक तयार होत नाहीत तोपर्यंत हे असेच चालणार का?
तुम्हाला कुणी नवोदित लेखक आढळले तर मला जरूर कळवा.
कारण जीवन हे हसत खेळत घालवणे गरजेचे आहे.



Comments
बरोबर आहे. पण आत्ताच्या वातावरणात विनोदी लेखकांना लिहायला प्रेरणा मिळेल असं वाटत नाही.
By : Bhalchandra Shrikhande
हल्ली लेखकच कमी झाले आहेत असे वाटतंय करण वाचक कमी झाले आहेत
By : Admin
Vinod nirmiti society nahi. Odhun tanun kelela Vinodacha uthalpana kalto aani hyasya nirmiti honyacha prashnach nahi.
By : Vijay Joshi
You may have your own point of view. But behind this is a commentary on sad state of indian politics. Sometime one needs to go overboard to state the obvious!
By : Admin
I don't understand your reply. What is the connection of Indian politics to my comment. My comment is on marathichi hasyajatra.
By : Vijay Joshi
Sorry! My mistake! Confusion on my part. Your comments completely correct and valid in present context.
By : Admin
😊
By : Vijay Joshi