हनिमून
(रात्रीचे अकरा वाजले आहेत. रचनाचा मोबाईल वाजतो.)
रोसेश: हलो रोचना, सो गयी क्या?
रचना: रोसेश, इतक्या रात्री फोन? काय झाले?
रोसेश: काही नाही, तमारी याद आई!
रचना: अरे, मम्मी, पापा, जागे आहेत. ऐकतील न!
रोसेश: मग? आता शादी आहे ना आपली!
रचना: आहे, झाली नाही अजून!
रोसेश: त्या करताच फोन केला होता. आपले सुरतला डेसिग्नेशन वेडिंग आहे ना!
रचना: डेस्टिनेशन वेडिंग!
रोसेश: चोकस! सुरतला दिनेश अंकलचा वेडिंग होल आहे. मोठा फार्म हाउस आहे. चार दिवस वेडिंग चालेल.
रचना: व्वा! किती मस्त!
रोसेश: तमारे माटे डायमंड ज्वेलरी घेतली आहे. लेब डायमंड! स्वस्त अने मस्त! दिनेश अंकलचा कारखाना आहे. पण मी फोन तेसाठी नाय केला. हनिमून डिसकस करायचा आहे तमारे साथे!
रचना: हनिमून डिसकस नसतो करायचा, एन्जॉय करायचा असतो!
रोसेश: अरे सुनो तो सही! मारा पापा इस्रो चेरमन का दोस्त छे. आपण हनिमूनला मुनवर जाणार!
रचना: हे इस्रो काय आहे?
रोसेश: अरे ते नाय का आकाशात चांद्रयान उडवतात. त्यात बसून मुनवर जाणार आपण!
रचना: काय? तू थोडी घेतली आहेस का?
रोसेश: इथे दारुबंदी आहे. मिळत नाही.
रचना: फेकू नको. जास्त दारु तर गुजरातमध्ये विकते.
रोसेश: सुन ना! एक ट्रावेल कंपनी आहे. वन डे वन नाईट पेकेज देते आहे.
रचना: फक्त एक नाईट?
रोसेश: मुनवर एक नाईट १४ दिवसांची असते. म्हणजे किती धमाल येईल बघ. १५ व्या दिवशी नंतर मुनची सफर.
रचना: पण तिथे हवा पाणी नाही आहे ना?
रोसेश: पेकेजमध्ये एसी रूम आणि बिसलेरी पाणी असेल. नाश्त्याला फ्रोझन फाफडा जलेबी, लंचला गुजराथी थाली, अने रात्री स्पेशल उंधियो! डेली वोडका अने विस्की बोतल!
रचना: पण मुनसफारी कशी करणार?
रोसेश: स्पेससूट घालून. त्यांची स्पेशल गाडी असणार.
रचना: पण खूप पैसे लागतील ना?
रोसेश: तेची चिंता नाय. मुकेश भाईची जिओ कंपनी लोन देणार. आजच लिस्टिंग झालाय कंपनीचे!
रचना: मग बुकिंग केलंय का?
रोसेश: हो.
रचना: किती तारखेचे?
रोसेश: २३ ऑगस्ट!
रचना: पण आपले लग्न तर ऑक्टोबर मध्ये आहे.
रोसेश: तू पण म्याड आहेस. अरे २०३५ चे बुकिंग आहे.
रचना: १२ वर्षांनी हनिमून?
रोसेश: शादी पण १२ वर्षांनी करणार ना!
रचना: काय? म्याड मी नाही, तू आहेस. (फोन कट करते.)



Comments
Nice fantasy.पण बारा वर्षांनी लग्न म्हणजे too much हं
By : Pratibha Tarabadkar
सॉल्लिड मस्त कल्पनाविलास 👌👌😁😁
By : Sheetal khire