चर्चासत्र


सामान्य माणसाने करावं तरी काय
चर्चेशिवाय हातात आहे काय राव?

राजकारणी येतात, आश्वासने देतात
पुढील निवडणुकीपर्यंत मग गायब होतात

आमचा आमदार बघितला होता एकदा
काळा का ते आठवत नाही, गोरा होता बहुधा

निवडून गेला तेव्हा एका पक्षात होता वाटतंय
आता कुठे आहे, त्याला तरी कुठे आठवतंय

गरीब बिचारी माणसे कामे करुन जगतात
हे राऊत मात्र त्यांचेच पैसे खातात

दहिहंडीला कधीतरी दिसतो टीव्हीवर
गौतमीबरोबर नाचत असतो स्टेजवर

मधूनच आठवण होते जनतेच्या हालांची
मग करतो निदर्शने घेउन चार गुंड बरोबर

रस्ता बंद गाडी बंद इकडेतिकडे दगडफेक
कुणालाच माहित नाही नुसतीच धूळफेक

पाच वर्षांनी येतात पुन्हा निवडणूका
हा बिचारा बापडा परत हात जोडून उभा

पुन्हा चर्चासत्रे पुन्हा रणधुमाळी
गरीब बिचारी जनता ऐकत राही सारी

पुन्हा तेच होणार पुन्हा तोच येणार
परत आश्वासनांची खैरात होणार

हे चक्र असेच सतत चालू राहणार
आपण फक्त वासरांत लंगडी गाय शोधणार

तर मग सांगा,

सामान्य माणसाने करावं तरी काय
चर्चेशिवाय हातात आहे काय राव?

Comments

वस्तुस्थिती आहे

By : Hemangi
18/10/2023 09 : 45 : 33 AM

Reality

By : Ajay joshi
18/10/2023 10 : 08 : 29 AM

वास्तवाचे यथार्थ वर्णन म्हणूनच कदाचित मतदार निवडणुकीत मत देण्यास निरुत्साही असतो.

By : Pratibha Tarabadkar
18/10/2023 10 : 15 : 44 AM

कटू वास्तव. कुठल्याही पक्षाचा उमेदवार आला तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही.

By : योगिनी लोथे
16/02/2024 9 : 28 : 58 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article