रस्ते


उभे आडवे वेडे वाकडे
इकडे तिकडे चोहीकडे
कधी दगडांचे कधी मातीचे
कधी गवतांचे पायघडे!

कुणा जोडती कुणा मिळविती
कधी जुळविती दो ह्रदये
कधी मोडिती आणि तोडिती
कधी ह्रदयांची हो शकले

पुरे जाहले या रस्त्यांवर
दूरदूर ते चालचालणे
कधी भेटीचे कधी विरहाचे
जीवनातले आर्त तराणे!

दूर क्षितिजावरी खुणविते
तेजस्वी ती शुक्रचांदणी
घेऊनीया हातात हाती
चल जाऊया दूर साजणी!

Comments

Nice !!!

By : Aniruddha Patwardhan
24/04/2023 8 : 52 : 07 PM

रस्ते.....खूपच छान वर्णन ... क्षितिजा वरची शुक्रचांदणी ... कल्पना छान आहे

By : मनीषा पोतदार
24/04/2023 9 : 45 : 43 PM

छान. मनपसंत

By : Santosh Kamat
03/05/2023 12 : 42 : 35 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article