मी आणि पाठीचा कणा


मी आणि पाठीचा कणा

शशांक पुरंदरे

माणसाला पाठीचा कणा आहे हे तेव्हा समजते जेव्हा त्याची पाठ त्रास देऊ लागते, दुखायला लागते. आपल्या सारख्या मराठी माणसांना मुळात पाठीचा कणा असतो का यावर एक परिसंवाद भरू शकेल. परंतु लौकिक अर्थाने न बघता वास्तविकपणे पाहिले तर पाठीचा कणा प्रत्येकाला असतोच. निदान माझ्या आणि आपल्या माननीय माजी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत तरी हे नुकतेच सिद्ध झालंय.

साधारण आठ-नऊ वर्षांपूर्वी मला डेंग्यू झाला आणि त्यानंतर माझे हात आणि पाय दुखायला लागले. व्हिटॅमिन्स आणि व्यायामाने नंतर दुखणे कमी झाले. परंतु नंतर परत पाय दुखणे वाढले, हातातली ताकद कमी झाली असे वाटले, ग्रिप कमी झाली. मला टाईप २ मधुमेह आहे त्यामुळे हे होत असेल असे वाटले. वास्तविक माझी शुगर लेव्हल नेहमीच लिमिटमध्ये होती. गेले एकदोन वर्षात हा त्रास वाढला. एकदोनवेळा चालताना पडलो. चालताना उजवा पाय खेचला जाऊ लागला. पाय खूपच दुखत होते, इतके की चालणे अवघड झाले होते. ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

शेवटी MRI केल्यावर असे लक्षात आले की हा पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम आहे. पाठीच्या कण्यात एकूण २६ मणके असतात. त्यातील ७ मानेमध्ये असतात आणि ५ लोअर बॅकमध्ये असतात. हे मणके एकमेकांना हाडाच्या discs नी एकमेकांना जोडलेले असतात. या discs कालांतराने दाबल्या जाऊन किंवा त्यातील हाड आत वाढून spinal cord वर दबाव आणतात आणि त्यामुळे त्याचा रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे लोअर बॅक आणि हातापायाची दुखणी निर्माण होतात. जर spinal cord वरचा दबाव जास्ती वाढला तर paralysis होऊ शकतो.

या सर्व गोष्टी विचारात घेता मला surgery करून घेणे आवश्यक होते. मी कोपरखैराणे येथील रिलायन्स हॉस्पिटल मधील डॉ. सुभाष धिवरे यांना कन्सल्ट केले. त्यांनी लगेच surgery करूया असे सुचवले. डॉ. धिवरे गेले ३५ वर्ष अशा शस्त्रक्रिया करत आहेत. त्यांच्या मते ही शस्त्रक्रिया risky तर होतीच, पण ती व्यवस्थित होईल असा आत्मविश्वास देखील होता. त्यांच्या सूचनेप्रमाणे सर्व pre-op चेकअप करून मी surgery साठी रुग्णालयात दाखल झालो.

माझ्या बाबतीत माझे c२-c३ हे मणके माझ्या spinal cord वर दबाव आणत होते आणि c४-c७ हे मणके जन्मापासूनच एकमेकांना जोडलेले होते. हे सर्व MRI केल्यानंतरच लक्षात आले. शस्त्रक्रियेमध्ये माझा (अक्षरश:) गळा कापून मणक्यांची हाडे ultrasonic cutter ने तासली गेली. या पद्धतीत spinal cord ला काही इजा होत नाही. शस्त्रक्रिया करताना असे लक्षात आले की हाडांमध्ये आणि spinal cord मध्ये फक्त १ मिलीमीटरची जागा होती. हालचाल करताना हाडे spinal cord ला घासली गेल्यामुळे मी दोनदा तरी पडलो होतो. अजून जागा कमी झाली असती तर paralysis नक्की होता. तेव्हा ही शस्त्रक्रिया अगदी वेळेतच झाली असे म्हणावे लागेल. नंतर मांडीच्या हाडाचा एक तुकडा काढून मणक्यांना जोडण्यात आला आणि एका टायटॅनियमची २० mm ची पट्टी लावण्यात आली.

हल्ली pain कमी करण्यासाठी इतकी औषधे आली आहेत की मला शस्त्रक्रियेदरम्यान काहीच दुखले नाही. सर्वात जास्ती त्रास आपल्या कुटुंबियांनाच होतो. एकदा शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्यावर मी निवांत होतो. कारण माझा स्वत:वर आणि डॉक्टरांवर पूर्ण विश्वास होता. पण सर्वात जास्ती ताण कुटुंबीयांवर असतो. याबाबत मी अश्विनी, माझी पत्नी अश्विनी, भाऊ भरत, त्याची पत्नी जयू, बहिण आरती आणि तिचा नवरा प्रदीप यांचा आयुष्यभर ॠणी राहीन. त्यांचे स्वत:चे problems असताना देखील अश्विनीचा भाऊ मिलिंद आणि स्मिताचा मानसिक support तेव्ह्ढाच महत्वाचा आहे.

शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी मी चालू लागलो आणि असे लक्षात आले की पायात खूपच सुधारणा आहे. चार दिवसांनी मी घरी आलो.

मानेची शस्त्रक्रिया असल्याने २४ तास मानेला पट्टी लावणे हा सर्वात मोठा प्रॅाब्लेम आहे. मी तीन महिने कसे काढले हे माझे मलाच माहिती आहे. विशेषत: पट्टा लावून झोपणे!! तीन महिन्यानंतर मी गाडी चालवू लागलो.

तीन चार महिन्यानंतर देखील चालण्यात हवी तेव्हढी सुधारणा नव्हती. सुदैवाने लोअर बॅक मध्ये विशेष प्रॅाब्लेम नव्हता. पण उजव्या पायात स्टीफनेस होता. जुपिटर हॉस्पिटल न्युरोरिहॅब मध्ये डॉक्टर अमित धुमाळे आणि डॉक्टर दीपेश सिंह यांनी हा प्रॅाब्लेम फिजियोथेरपीने नव्वद टक्के सोडवला. यात दीपेशचे विशेष जास्ती योगदान आहे.

अजूनही माझे पाय पूर्णपणे बरे नाहीत. But I will get there. जरी spinal cord वरील दाब निघाला असला तरी थोडी जखम राहतेच. अश्या गोष्टी ठीक व्हायला वेळ लागतो. आणि वय देखील एक factor आहे.

माझी पत्नी अश्विनी हिच्याबध्दल काय लिहू? गेले दोन वर्ष ज्या मानसिक तणावाखाली तिने काढली आहेत ते तिचे तिलाच माहित! माझ्या बरे होण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे.

डॉ. धिवरे यांचे आभार मानणे देखील आवश्यकच आहे. त्याच्याकडे पाहूनच मनात एक विश्वास निर्माण होतो. आणि शल्यकौशल्य तर आहेच. ते स्वत:च म्हणाले की ही अतिशय कठीण शस्त्रक्रिया होती. धन्यवाद डॉक्टर!

हे सर्व इतक्या विस्ताराने सांगण्याचे प्रयोजन असे की प्रत्येक गोष्टीला धैर्याने तोंड दिले पाहिजे. घाबरून काही होत नाही. Modern medicine वर विश्वास ठेवा. आणि मुख्य म्हणजे चांगला डॉक्टर शोधून त्याच्यावर विश्वास ठेवा. कुठलेही symptom इग्नोर करू नका. शस्त्रक्रियेनंतर व्यायाम आणि फिजीयोथेरपी करत रहा. ही शस्त्रक्रिया कदाचित आधी झाली असती तर recovery लवकर झाली असती. पण ठीक आहे, देर आये पर दुरुस्त आये! म्हणून आज हे लिहू शकतो आहे.

Never give up, guys !!!!!!

Comments

👍

By : Mona
09/03/2024 12 : 01 : 43 PM

Appreciate your spirit. Mental strength is most important to pull through the last patch of any race.... Never give up !!!

By : Pradeep Deshpande
09/03/2024 2 : 54 : 47 PM

Thanks for sharing! नाहीतर hospitalization बद्दल इतके negative ऐकायला मिळते की doctor कडे जायलाच भिती वाटते.

By : Sheela Bahadkar
09/03/2024 5 : 42 : 05 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article