कहाणी


कहाणी

डोंगरी पसरे चादर धुक्याची
रविही घेई विश्रांती जराशी
मेघही लागे हळू तो गळाया
पाने फुले तरुही हसली जराशी

निर्झरात वाहे खळखळ ते पाणी
फुटली पक्षांना नवी जणू वाणी
मरुतून पसरे सुगंध क्षणोक्षणी
निसर्ग गुंफतो मग आगळी कहाणी

क्षणार्धात जाई धुके मग विरुनी
रवि तो निघे मग हळुवार चालीनी
धमक पिवळे ऊन येई माळरानी
पुन्हा निसर्गाची नवी एक कहाणी

शशांक

Comments

मस्त....तुमच्या घरातल्या माझ्या कट्ट्यावर नसल्यासारखं वाटलं कविता वाचून

By : PRADNYA GORE
13/09/2026 11 : 40 : 10 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article