जेष्ठ नागरिक म्हणजे सिनियर सिटीझन (तिच्या नजरेतून)
वाढले वय
झाले सिनियर सिटिझन
घर एके घर
कुठलं आलय मीपण?
समोरून येतसे
छान सुबक तरूणी
ह्याचे लक्ष तिच्याकडे,
कारण मी फक्त गृहिणी
तरूण म्हणतात काकू,
कशी आहे तब्बेत?
आणि काकांना म्हणतात
चला करुया बेत!
समोरची टिटवी
बघत नाही ढुंकून
पण भाजीत मीठ किती घालू?
विचारते फोन करून
इतके वर्ष
सांभाळले नवरोबाला
पण नातवंड पाहून वाटतं
तोच बरा!
नातवंड तशी
आहेत मोठी गोड
पण मी तरी आयष्यात
किती करू तडजोड?
सूनबाई आपली
आयटी त बिझी
मुलगा सांभाळतो
तिचीच मर्जी
कधीतरी येते
मग त्याची आठवण
जुन्या त्या वर्षांची
जागते मनात साठवण
कधीतरी दिसतो
बाजारात फिरताना
हाताशी दोन नातू
तारांबळ पोट सावरताना
बायको मात्र मोठी
पटवली आहे छान
दिसते किती छान
आहे राखून मान
जीवनाच्या प्रवाहात
राहिली हौस मौज
पण वाटतं आतातरी
स्वच्छंद जगावं आज
तसं बघितलं तर
काय कमी आहे मला?
संक्रांतीला अजूनही
शोभते काळी चंद्रकला!
आता काळ्या केसांमध्ये
चमकते नक्षी चांदण्याची
तरीही वळून पाहतात,
येता जाता पक्षी
कधीतरी दुपारी
येतात मैत्रिणी घरी
मैफिल जमते गप्पांची
ऐकतात खवट शेजारी
जणू सुरु झाली आहे
आता दुसरी इनिंग
म्हणून तर आहे
आयुष्य अजून थ्रीलिंग!!
कधीतरी मग
ठरते आमची पिकनिक
सून घेते रजा
बसते मुलं सांभाळीत
मग एके दिवशी
येते नवऱ्याला लहर
म्हणतो चल जाऊ
मरीन ड्राईव्हवर
हातात हात घालून
फिरतो वाळूवर
आणि धो धो पावसात
भिजतो पळभर
मग घरी आल्यावर
भरतो याला ताप
आणि मी करते
शिंकांची खैरात
दुसऱ्या दिवशी पुन्हा
होते मी गृहिणी
सुनबाई आयटी मधे
आणि मी घरची राणी



Comments
Sunder !
By : Swapna Ballal
👍👍👍👍👍👍
By : Sunil Moghe
मस्तच मनोगत!!
By : Bhalchandra Shrikhande
सुरेख
By : दीपक
मस्त
By : शीतल
आयुष्याच्या या वळणावर जगूया आनंदाने जरी शरीर न देतसे साथ , कर्तव्य न सोडी पाठ
By : प्रतिभा ताराबादकर
Excellent KAKA
By : R K
Masta👌🤗
By : Jayu
छान निरीक्षण आहे, धर्वत नाही आणि सोडवत पण नाही 😊
By : समीर घारे
चांगले रंगवलेस चित्र !
By : Mohini chitre
छान!!
By : Vijay