स्पर्श
स्पर्श
शशांक पुरंदरे
अमरने रंजनाला आपल्या जवळ खेचले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून एक दीर्घ चुंबन घेतले.
“आज स्वारी रोमॅटिक मूडमध्ये दिसतेय.” त्याच्या मिठीतून स्वत:ला सोडवत रंजना उद्गारली.
“सवड आहे आणि वेळही! मूड तो बनताही है!”
“पण आज काही उपयोग नाही. माझा पिरीयड सुरु आहे.”
“ओह नो! सारखा कसा तुझा पिरीयड असतो? गेल्या जन्मी शिक्षिका होतीस काय?”
“महाशय, पिरीयड महिन्यातून एकदाच येतो.”
“काय सांगतेस? मला तर वाटले कालपरवाच येऊन गेलाय!” असे म्हणून अमरने रंजनाला गालावर एक चापटी मारली.
“अरे हळू, लागले ना मला! आणि येताजाता मला चापट्या कसल्या मारतोस? आजूबाजूला जरा पहात जा. अनुष्का आता चौदा वर्षांची झालीये. तिला समजतं आता बरंच काही.”
“म्हणतात ना लहान मुलांना आधीपासूनच सेक्स एजुकेशन दिले पाहिजे.”
“हो पण प्रात्याक्षिक करून दाखविण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या शरीरात होणार्या बदलाबध्दल सांगितले पाहिजे. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाबध्दल जाणीव करू दिली पाहिजे.”
“पण हे सर्व आपण त्यांच्याबरोबर बोलणे जरा अवघडच आहे.”
“अरे वा, तिच्यासमोर मला मिठ्या मारताना अवघड नाही वाटत तुला?”
“अग ते स्वाभाविक आहे. सहज घडून जातं.”
“मग हे पण सहजपणे सांगता आले पाहिजे ना.”
“पण कसे?”
“बघुया, जमेल. माझी एक मैत्रीण आहे अर्चना कुलकर्णी म्हणून. ती सेक्सॉलॉजिस्ट आहे.”
“अरे वा!”
“तुला काही प्रॉब्लेम आहे? जाऊया तिच्याकडे?” रंजना उपरोधाने म्हणाली.
“तसं नाही, पण-“
“ते जाऊदे. तिने मला काही पुस्तके दिली आहेत ज्यात या गोष्टी सहज भाषेत समजून सांगितल्या आहेत. मी ती पुस्तके अनुष्काला देणार आहे. तिचा पिरीयड सुरु झाला आहे. नशिबाने ती घरीच होती त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. तशी मी तिला आधी कल्पना दिली होती. स्वच्छता कशी करायची, सॅनिटरी पॅडस् कसे वापरायचे ते संगितले होते. बायकांना काय प्रॉब्लेम्स असतात तुला काय माहित?”
“जसे काही आम्हाला प्रॉब्लेम्स नसतातच.”
“तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतात रे?”
“सांगतो. मी दहा-बारा वर्षांचा असेन. एक दिवस रात्री माझी अंडरवेअर झोपेत ओली झाली. मला वाटले झोपेत शू झाली, पण वीर्यपतन झाले होते. अर्थात तेव्हा मला काही समजले नाही. मी सकाळी घाबरतच आईला सागितले. माझे बाबा म्हणजे घराचे अफजुलखानच! पण आईने बाबांना सागितले. बाबांनी मला हाक मारली. मी थरथर कापत होतो. पण अगा नवल घडले! बाबांनी मला जवळ घेतले आणि म्हणाले, घाबरू नकोस. लहान वयात असे होते. हे नैसर्गिकच आहे. रात्री घट्ट कपडे घालू नकोस.”
“एकंदरीत काय, मुलगा असो वा मुलगी, वयात येताना मुलांना या गोष्टी समजावून सांगणे गरजेचे आहे हेच खरे!
“अरे यार, माझा बाबा ऐकतच नाही. तो म्हणतो मुलांबरोबर फुटबॉल खेळायचा नाही.” अनुया तावातावाने सांगत होती.
“मी त्याला म्हटले, अरे ती सगळी मुलं चांगली आहेत. आम्ही आमचा खेळ सुधारावा म्हणून त्यांच्या बरोबर खेळतो. आता सांगा, यात काय चुकीचे आहे? माझी आई तर म्हणते, हिला मुलींच्याच शाळेत घातले पाहिजे. कुठल्या जमान्यात राहतात ही माणसे!”
“हल्लीचा जमानाच असा आहे”, अनिरुद्ध म्हणाला, “त्यांना काळजी वाटणे साहजिकच आहे.”
“हे मात्र खरं आहे. परवाचीच गोष्ट सांगते”, सिद्धी उद्गारली, “चित्रकलेच्या क्लासला मी चित्र काढत होते. आपले बुरकुले मास्तर मागे उभे राहून बघत होते आणि बघता बघता माझ्या खांद्यावरच हात ठेवला त्यांनी! मी त्यांना म्हटले, सर खांद्यावरचा हात काढा, तेव्हा पटकन निघून गेले. परत त्यांनी असे काही केले तर मी तक्रार करीन त्यांची! बरं झालं आपल्याला आपल्या आईनी गुड टच, बॅड टच बद्धल सांगितलय ते.”
“हो पण म्हणून आपण खेळायचेच नाही का?”
“आपण एक काम करूया. आपल्या सरांना घेऊन तुझ्या बाबांकडे जाऊया. ते समजावतील बाबांना!” अनिरुद्ध म्हणाला.
“ये बात”, म्हणून अनुयाने त्याला टाळी दिली”, “याला म्हणतात गुड टच!”
“बॅड टच कसा असतो ते दाखवू का?”
“कानाखालती वाजवली तर कसा आवाज येतो ते ऐकवू का?”
“अग, मजा केली जरा!”
“हो ना, मी पण मजाच केली!”



Comments
Awe न करता गोष्टी सहज सोप्या करता येतात.
By : स्वाती मराठे