आम्ही आहोत


आम्ही आहोत !

शशांक पुरंदरे

एक कविता माझीही
नाही संकर्षण- अशोकांची
ते आहेत मोठे कवी
पण मी देखील लिहितो कधी कधी

राजकारण माझा विषय नाही
नेत्यांशी कधी भाषण नाही
आमचं कोण कशाला ऐकेल
जो तो तोंडाला येईल ते बकेल

पण मी म्हणतो जिभा आवरा
स्वतःला जरा सावरा
आपण कुठून आलोय ते आठवा
कुठे चाललोय ते लक्षात ठेवा

जनता आता शहाणी आहे
खरंखोटं जाणणारी आहे
उखाळ्यापाखाळ्या काढू नका
इतरांचा नाही, स्वतःचा तरी मान राखा

गांधी नेहरु शिवाजी महाराज
सर्व गोष्टी जुन्या झाल्या
स्फूर्तिस्थाने जरूर राहूद्या
पण नवीन काहीतरी घडवूया

चांगले काही केलेत,
आम्ही पाठीशी आहेत
वेडवाकडं कराल तर
तुम्ही आहात आणि आम्ही आहोत

Comments

सद्यस्थितीवर योग्य भाष्य.

By : योगिनी लोथे
11/05/2024 8 : 01 : 02 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article