तीन कविता


दुःख नभाचे

शशांक पुरंदरे

कुणाला कळावे दुःख या नभाचे
नयन जर कोरडे असता तयाचे
अनावर होता गहिवर तयाला
धुंवाधार मग तो बरसून गेला

----------------------------------------------------

वारा

शशांक पुरंदरे

असा हा बेभान वारा
इथून तिथे फिरे बिचारा
नाही सुकाणू नाहीत वाटा
नियतीच दावे मार्ग तयाचा

खेळतो कधी तिच्या पदराशी
उडवून मोहक बट जराशी
स्मितहास्य फुले तव ओठांवर
खोल घाव माझ्या हृदयावर

कधी बनून झुळुक शीतल
आल्हादितो तनमने सकलांची
कधी धावूनी आवेगाने
त्रेधा तिरपीट सर्व जणांची

घेऊन येई घन वर्षाचे
तृषा शांत करी राने वने
झाडे झुडपे वृक्ष वेली
बहरती मग आमोदाने

पण मग बनतो क्रूर कसा हा
ना सावरे आवेग तयाला
उध्वस्त करी क्षणात सारे
मनुष्यप्राणी निमित्त बिचारे

खेळ चालतो हा नियतीचा
युगायुगांच्या सारीपाटावर
आपण फक्त खेळायचे
कुणी कुणाला आवरायचे

-------------------------------------------------------

जल

शशांक पुरंदरे

जल म्हणजे जीवन
जसे तुझे माझे मन
ना रंग ना आकार
सदा असे निर्विकार

तोषविते तनमनाला
भूषविते नयनांना
दाविते दुःख कधी
कधी हर्षोल्लासाला

सजल नयन नितधार बरसती
मनामनांचे गुपित सांगती
आवरुन मग जलस्रोताला
चालत राहू मार्ग संगती

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article