अग्नी


अग्नी

शशांक पुरंदरे

घरातून येताहेत
किती छान सुवास
चुलीवर शिजताहेत
पदार्थ काही खास

नीयांडरथल पासून
होमो सेपियन पर्यंत
सर्वांनी साधले
अग्नीवर नियंत्रण

इतर प्राण्यांपेक्षा,
मानव प्राणी वेगळे
उदरभरणाला,
अन्न हवे शिजलेले

पण पंचमहाभूतांवर,
नियंत्रण नेहमीच न मिळे
कधी रौद्र रुप घेऊन
करी भस्मसात सगळे

आपण सर्व,
प्रवासी घडीचे
जीवन अपुले
काही पळांचे

क्षिति आप ताप
पवन आणि शून्य
पंचमहाभूते मात्र
अस्तित्व अनंताचे

तळटीपः भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी (क्षिति), जल (आप्), अग्नि (ताप), वायु (पवन) व आकाश (शून्य) यांना पंचतत्त्व अथवा पंचमहाभूते म्हणून ओळखले जाते.

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article