पृथ्वी
पृथ्वी
शशांक पुरंदरे
सौरमालेतून बाहेर जाताना
व्हॅायेजरने टिपली छबी
कार्ल सेगनच्या दूरदृष्टीने
दिसली शून्य जरी
ब्रम्हांडाच्या पसाऱ्यात
असेल शून्य जरी
आहे आपले घर
भासते अनंतापरी
कधी कोण उल्का
आदळली भूवरी
जन्म झाला आपुला
अपघात होता जरी
ब्रम्हांडाच्या घड्याळात
काही सेकंदांचा खेळ
आपला मात्र आहे
आयुष्याचा मेळ
परंतु आपण मांडलाय
पृथ्वीचा अक्षम्य छळ
भांडतोय इंचांकरिता
होतोय आवेग अनावर
जल वायू अग्नी
आकाश अन् पृथ्वी
हाच एक आधार
आपल्या जीवनाशी
नका करू काही
जेणे होईल ह्रास
उरेल मग जीवन
केवळ एक आभास



Comments