मागे वळून पाहता
मागे वळून पाहता
शशांक पुरंदरे
मी दर रविवारी सकाळी दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर सकाळी ८ वाजता रांगोळी कार्यक्रम न चुकता पाहतो. बहुतेक वेळा हा कार्यक्रम मला १९७०-८० मध्ये घेऊन जातो. कारण त्यात खूप जुनी गाणी दाखवली जातात जी ऐकणे हल्ली दुर्मिळ झाले आहे. त्या काळात रेडिओ हे एकाच करमणुकीचे साधन होते. माझ्या घरी लहानपणी गंमतजंमत माझा आवडीचा कार्यक्रम असायचा. मी एकदा आकाशवाणीला पत्र देखील पाठवले होते. माझे नाव त्या कार्यक्रमात ऐकून मला धन्य झाल्यासारखे वाटले होते.
रेडिओ सिलोन वर दर बुधवारी रात्री आठ वाजता बिनाका गीतमाला ऐकणे म्हणजे एक पर्वणी होती. त्या आठवड्यातली सर्वात लोकप्रिय सोळा गाणी लागत. अमीन सयानी साहेबांच्या आवाजातील संचालन गाण्याएव्हढेच मधुर असायाचे. त्यांच्या एव्हढा छान आवाज असलेला अजून एकच आवाज होता. तो म्हणजे त्यांचे मोठे बंधू हमीद सयानी यांचा. विविधभारतीवर प्रेषित कार्यक्रम सुरु झाल्यावर बोर्नव्हीटा क्विझ स्पर्धा मी न चुकता ऐकायचो तो बरेच वेळेला त्यांचा आवाज ऐकण्यासाठी. अतिशय फर्डा इंग्रजी बोलायचे ते! सामान्य ज्ञानात भर पडायची ती वेगळीच! क्रिकेट विथ विजय मर्चंट आणि तल्यारखान याचे कार्यक्रम देखील छान असायचे. गाणी ऐकायची गोडी देखील तेव्हाच लागली असावी. लता, आशा, रफी, किशोर म्हणजे पर्वणीच होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचा रेडिओ चालू असायचा. आत्तादेखील हे लिहित असताना बाजूला लताचे सख्यारे घायाळ मी हरिणी हे गाणे ऐकतोय. नुकतीच मी बोसचे होम थिऐटर विकत घेतलय. खरं सांगतो, कधी न ऐकलेली वाद्ये यात ऐकू येतात. नवीन जग, नवीन तंत्रज्ञान !
रेडिओच्या किती आठवणी आहेत. १९६९ चे चंद्रावरील पहिले पाउल, ७१ चा विंडीज विजय, आणि इंग्रजांचा पराभव, जसदेव सिंगचे हॉकीचे हिंदी समालोचन, ७५ ची आणीबाणी, जनता पक्षाचा विजय, हॉकी विश्वकप विजय, ऑलीम्पिक गेम्स काय काय ठवू आणि लिहु. जॉन आर्लोटचा आवाज अजूनही कामात घुमतोय.
टीव्ही आल्यावर रेडिओ मागे पडला. टीव्ही वरचे छायागीत, रविवारचा सिनेमा, त्या मॅचेस! घरी रंगीत टीव्ही आल्यावर बघितलेले पहिले ऑलिम्पिक, कितीतरी गोष्टी आहेत. आता तर ४k ५५ इंचाचे संच आहेत, पण पहिला टीव्ही पहिल्या प्रेमासारखाच आहे.
सध्या टीव्ही वाहिन्यांपेक्षा ओटीटी बरे वाटतात. आता परत बन्धुप्रेमाचे दिवस आलेत म्हणे! मुलाखत मुलाखतच खेळ परत सुरु झालेत. राजकारण्यांची लक्तरे लोंबताना पाहण्यापेक्षा ओटीटी खूप बरे! जगातील सर्व युद्धे जिवंत दिसतात पण माणसे मात्र खरं मरत आहेत. पण हल्ली माणसाच्या जीवाची अशी काय किंमत असते म्हणा! ट्रंप, पुतीन वगैरे जगाची वाट लावूनच जाणार असे दिसतंय!
जाउदे, हे सर्व आपणाला देखील माहित आहे. अजून काय लिहू? त्यापेक्षा मी आणि जगजीत सिंगचा जादुई आवाज हेच चांगले आहे!!



Comments
Khara ahe vachatana dekhil purvi chya vishwat gheun gela ha lekh
By : Mona
त्या काळातील चलचित्रपट नजरेसमोर दिसला
By : शितल
झकास. शाळेत जातानाचा बस चा प्रवास. त्यात सुद्धा डबल डेकर, पावसात कांगा लीग बघायले जायचो,शाळेत मधल्या सुट्टीत कधी मधी इडली, बटाटा वडा खायचं ती मजा काही और च.BBC ची कॉमेन्ट्री, खूप आठवणी आहेत
By : Shirish Joshi
पूर्वी थिएटर मधे जायचे म्हणजे काहीतरी विशेष असायचे, आता घरोघरीच होम थिएटर आले आहे. मेरा भारत महान,!!
By : Shirish joshi
'मागे वळून पहाता' खूपच आवडले...सर्व बाबतीत तुमच्याशी पूर्ण सहमत..तुम्ही लिहीलेल्या आठवणी माझ्या ही आहेत पण शब्दांकन तुम्हास छान जमते.. धन्यवाद असेच लिहीते रहा
By : संजीव दाणी
Nostalgic , it was so beautiful to go into that world of 1975 onwards, when all these programmes mentioned by you were part of our lives Thank you for giving that Joy we had in those olden days.
By : Cyril David
पूर्वीचे वास्तववादी जीवन डोळ्यासमोर उभे राहिले. म्हणतात ना जुनं ते सोनं. त्या काळात शांती होती सुकून होता. आता राजकारण आणि रोजची नवीन नवीन आव्हान कसं काय सामोरे जायचा त्याला आता?
By : Krupa Nitin Ghag.