संध्याकाळ
गवाक्षातुनी कटाक्ष टाकत आली संध्याकाळ
सोनपावली येउन बसली हसली संध्याकाळ
तेजपुंज लोह्गोलतो विझला होता आता
चराचरावर तिचेच होते अधिराज्य आता
किलकिल करती पक्षी पांखरे गाती जाता जाता
सप्तसुरांची मैफिल सजली रंगमहाली आता
रंगांची पण झाली उधळण अवकाशी आता
स्वररंगांचे तरंग उठती क्षितीजावर आता
पर्वतरांगी उमटे मग ती पुसट चंद्रकोर
निशा प्रगटते होऊन मग ती चांदण्यावरी स्वार
स्वप्न उद्याचे मनी रेखीले सरेल हा काळ
नवरंगांची पुन:श्च उधळण पुन:श्च संध्याकाळ



Comments
वाह वा, सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे!!
By : Bhalchandra Shrikhande
सुंदर कविता. पुरंदरे काकूंची आठवण झाली.
By : Pratibha Tarabadkar
👌👌👌
By : Mrunal
Chhan!!
By : Vijay Joshi
संध्याकाळ रमणीय झाली आहे
By : संदीप नाचणे
किती सुंदर चित्रीकरण केले आहेस शशांक 🙏
By : Mohini chitre
Superb 👍
By : SUNILMOGHE
छान कल्पना
By : शिरीष