येउ दे ओठांवरी


"होशवालों को खबर क्या", या जगजीत सिंग यांच्या सुप्रसिध्द गझलचा स्वैर मराठी अनुवाद

येऊदे ओठावरी तव
गुपित हे ह्रृदयातले
प्रेम कर अन् ऐक वेडे
सूर हे जगण्यातले

भेट झाली दोन वेड्या
लोचनांची ही कशी
आज कळले या मनाला
गूढ हे प्रेमातले

मोकळ्या केसांत तुझिया
षड्ऋतूंचे काव्य हे
झुकलेल्या नजरेत तुझिया
कल्पनेतील गाव हे

शब्दी मी गुंफू न शकलो
या मनातील भाव हे
उमजले नाहीच तुजला
मन्मनीचे ठाव हे

ही गझल माझा मित्र अभिजित राजे याने संगीतबध्द करून गायली आहे. youtube video

Comments

अनुवाद एकदम चपखल, गाणंही एकदम छान जमून आले आहे

By : देवेंद्र बुध्दिकोट
21/04/2023 12 : 21 : 50 PM

सुरेख अनुवाद, अभिजित राजेंनी या गझलेला छान न्याय दिला आहे.केमिस्ट्री मस्त जमली आहे.

By : हेमांगी
24/04/2023 10 : 04 : 55 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article