रवि हा


सकाळी कधी नव्हे ते पडलेले कोवळे उन, मंद वाऱ्यावर डोलणारी झाडांची हिरवाी पाने म्हणजे रविराजाचे मान झुकवून केलेले स्वागतच, अवकाशात विहार करणारे असंख्य पक्षी आणि कानावर पडणारे त्यांचे प्रातस्वर, असा हा घराच्या खिडकीतून दिसणारा निसर्गाचा नजराणा पाहून कविता सुचली नसती तरच नवल!

रविराजाने पसरले
आपले दोन्ही हात
सोनेरी किरणांची
हासत आली पहाट

तरूवेलींनी घेतला
एक दीर्घ श्वास
कर्णी गुणगुणती
पाखरांचे उछ्वास

वेळुंच्या बनातून
येई पहाटवारा
कुजबुजे कानाी मग
जागला निसर्ग सारा

वाऱ्यावर डोलती
हिरवाी झाडपाने
स्वागता रविकिरणी
झुकली मनोमनाने

उघडून पंख अपुले
पक्षी विहार करती
मधुर गीत तयांचे
आसमंत मोहविती

सामावू कसे हे
चित्र मनांत मी
घेणे दो करांनी
ह्रदयात रेखुनी

Comments

अतिशय सुंदर कविता.निसर्गाच्या विलोभनीय रुपाचे हृद्य वर्णन .

By : Pratibha Tarabadkar
29/09/2023 08 : 04 : 39 AM

सुरेख

By : दीपक टिकेकर
29/09/2023 08 : 11 : 24 AM

Apratim

By : Mona
29/09/2023 12 : 26 : 13 PM

खूप सुंदर वर्णन निसर्गाचे ! पहाटेचे सूर्य किरण खिडकीतून आत आलेले चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले 🙏

By : मोहिनी चित्रे
29/09/2023 1 : 08 : 06 PM

सुरेख

By : Sheetal
29/09/2023 3 : 50 : 45 PM

Wah wah. सकाळची running commentary च.👌

By : Shirish joshi
13/10/2023 01 : 04 : 47 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article