मोहिनी चित्रे कुलकर्णी - दोन कविता


१. माझी कविता

आली होती एक
कविता माझ्या मनात
म्हटले ये जरा सत्यात
शब्दांच्या रूपात

म्हणाली काय आहे शब्दात
भावनांच्या विना
जसा माणसांच्या सागरात
स्वजना विना

कविते शब्द सांगतात
न सांगता सारे
जन्मभराची व्यथा
एका हुंदक्यात

म्हणता वाऱ्याची झुळूक
हलला पदर मनात
दरवळला मोगरा
हळुवार स्पर्शात

विरह एक शब्द
जाळतो मनाला
माहेर शब्द नेई
आईच्या कुशीला

कविते गुंफले शब्द
ओथांबल्या भावना
आई या हाकेत
विश्व् माझे मावेना

----------------------------------------------

२. नातं माझं बहिणीचं

मनातले सांगायला
तू ये माझ्याकडे
नसला वेळ तरी
काढीन तुझं ऐकायला

काही नवीन केलंस ?
दाखव ना मला
वेळेचा कसला विचार
प्रेरणा द्यायला घ्यायला

जायचे कुठे तुला
सांग ना मला
आहेच तुझ्या बरोबर
तू जाशील तिथे

एकटं वाटतंय तुला ?
समजतंय न बोलता मला <
तुझ्याशी गप्पा मारताना
वेळेचा न पाबंद मला

कधीही केव्हाही
फोन कर मला
message ठेवायच्या आधी
फोन करिन तुला

बोलून टाकण्यासाठी सगळं
व्यक्त करण्यासाठी मनातलं
देवानेच मला बनवलं
तुझ्या पाठोपाठ पाठवलं

तुझं माझं नातं काय
प्रश्नांची गरजच काय
दोन मनाच्या जवळीकतेचं
नातं हे जीवनभराचे

नातं माझं बहिणीचं

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article