संस्कृती आणि समाज
संस्कृती आणि समाज
दरवर्षी १४ जानेवारीला सूर्याचे उत्तरायण सुरु होते. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून साजरा होतो. प्रत्येक राज्यात हा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. थंडीचे दिवस असल्यामुळे तीळ, गुळ किंवा तत्सम पदार्थांचे सेवन केले जाते. मुख्यता तिळगुळाचे लाडू बनवून एकमेकांना वाटून गोड बोलण्याचा संदेश दिला जातो. या महिन्यात हळदीकुंकू समारंभ करण्याची प्रथा आहे. एखाद्या नवविवाहितेला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून हलव्याचे दागिने घालुन फुलांनी सजवलेली झोपाळ्यावर बसवले जाते. ही परंपरा वर्षानुवर्ष, कदाचित अनेक शतके चालू आहे. फक्त प्रश्न एकच आहे.
आपल्या समाजात स्त्री-पुरुष भेदभावाची परंपरा देखील अनेक शतके चालू आहे. आत्ता आत्तापर्यंत स्त्रियांना घरी बसवण्यात आले होते. चूल आणि मूल एव्हढेच तिचे कार्यक्षेत्र आहे असे तिच्या मनावर बिंबवण्यात आले होते. तिला घराबाहेर पडण्यापासून प्रतिबंध केला. काळापरत्वे या गोष्टी बदलल्या. आज स्त्री बहुतांशी मुक्त झाली आहे. पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत.
पूर्वीच्या काळी एखाद्या स्त्रीचा नवरा गेल्यानंतर तिचे केशवपन करण्यात येत असे. तिला घरात बंद करण्यात येत असे. दागदागिने, चांगली वस्त्रे घालायला बंदी केली जायची. हल्ली या सर्व गोष्टी बंद झाल्या असल्या तर विधवापण अजूनही त्यांच्या कपाळावर लिहिलेले आहे, किंबहुना कपाळावरचे सौभाग्य पुसलेलेच आहे. विधवा स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कपाळाला कुंकू लावू नये अशी प्रथा आहे. आणि याचा संबंध हळदी -कुंकू समारंभाशी आहे.
विधवा किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रिया अशा समारंभात भाग घेत नाहीत. असे समारंभ केवळ विवाहित स्त्रियांसाठी आयोजित केले जातात. नवरा गेला आहे, किंवा घटस्फोट झाला आहे यात या सारख्या स्त्रियांची काय चूक आहे? का समाज त्यांना या गोष्टीची सजा देतो?
आमच्या गृहसंकुलात काल एक नवीन प्रथा सुरु झाली. काल हळदी-कुंकू समारंभाऐवजी तिळगुळ समारोह आयोजित केला गेला ज्यात केवळ विवाहित स्त्रिया नाही तर सर्व स्त्रिया आणि पुरुषही सामील झाले. हे छोटेसे पण क्रांतिकारी पाउल आहे. आमच्या गृहसंकुलातील स्त्रियांनी काळ हे दाखवून दिले की समाजात क्रांती मोर्चे काढून किंवा आंदोलने करू येत नाही तर अशा छोट्याछोट्या गोष्टीतून होते. सर्व स्त्री वर्गाचे मनापासून अभिनंदन!
मला आशा आहे की लवकरच ही प्रथा सर्वत्र प्रचलित होईल.
शशांक पुरंदरे
I congratulate all ladies of our society for converting a haldi-kumkum celebration into tilgul function to facilitate all the ladies and gents to participate in this function. This is truly revolutionary step. Thank you so much!
Shashank Purandare



Comments
khara ahe panache he sarva badalle pahije
By : Mona
आमच्या इथे ही प्रथा केव्हाच बंद करून तीळगुळ समारंभ असे सुटसुटीत नाव दिले आहे ज्यात पुरुषही भाग घेतात.
By : Pratibha Tarabadkar
Great!
By : Admin
Good , worth mentioning activity by the women folks Congratulations to that women's group. . Congratulations to you too for writing about such activities.
By : Cyri David
Yes, we should change n reinvent with changing times. Kudos to Ashwini for putting forth the idea! Everybody enjoyed yesterday's Tilgul Samaranbh in our society.
By : Sheela Bahadkar