शून्य


शून्य

अश्रुंचा बांध फुटला आहे
जीव अजुनही गुंतला आहे

वेळ न कधी थांबला आहे
सदैव पळत राहिला आहे
न काही नाते उरले आहे
तरीही जीव गुंतला आहे

आठवणींचा निचरा झाला आहे
क्षणांचा पाचोळा शिल्लक आहे
जीवनाची वजाबाकी संपली आहे
केवळ शून्य उरले आहे

अश्रुंचा बांध फुटला आहे
जीव अजुनही गुंतला आहे

- शशांक पुरंदरे

Comments

👌👌👌

By : Sheela Bahadkar
04/04/2024 7 : 51 : 31 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article