आपण काय करु शकतो?


आपण काय करु शकतो?

ट्रंप जगाला धमक्या देतो
पण आपण काय करु शकतो?

ट्रंप अमेरिकेलाच धमक्या देतो
पण आपण काय करु शकतो?

मोदी ट्रंप आपापसात ठरवतात
पण आपण काय करु शकतो?

महागाई वाढतेच आहे
पण आपण काय करु शकतो?

सरकार शैक्षणिक धोरण सतत बदलते
पण आपण काय करु शकतो?

तिन्ही सेना आपापसात भांडतात
पण आपण काय करु शकतो?

भाजपा फक्त मजा बघतो
पण आपण काय करु शकतो?

मराठी हिंदी वाद उकरतात
पण आपण काय करु शकतो?

मराठी माणूसच मराठी न बोलतो
पण आपण काय करु शकतो?

मुलांना इंग्रजी शाळेत घालतात
पण आपण काय करु शकतो?

मुलांना फ्रेंच, जपानी शिकवतात
पण आपण काय करु शकतो?

सगळे पाहून मन विषण्ण होतं
पण आपण काय करु शकतो?

आपण गपगुमान बघू शकतो
दुसरे काय करु शकतो?

फारतर कविता लिहू शकतो
दुसरे काय करु शकतो?

कविता करमणूक म्हणून वाचल्या जातात
वाचक तरी दुसरे काय करु शकतात?

जगणे अवघड झाले आहे
पण त्याला पर्याय काय?

जीवन एकदाच मिळते हो,
जमेल तसं जगायचं असतं

शशांक

Comments

हिला कविता कसे म्हणावे?

By : Swati Marathe
19/04/2025 12 : 48 : 31 PM

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा एकाने दुसर्‍यास गिळावे हीच जगाची परंपरा

By : संजीव दाणी
19/04/2025 1 : 25 : 06 PM

आपण समदुख्खी / समसुखी होवू शकतो 🙏

By : मोहिनी चित्रे
22/04/2025 09 : 04 : 48 AM

जीवन एकदाच मिळाले आहे आनंदाने जगायचं असतं.......

By : प्रज्ञा गोरे
11/05/2025 5 : 09 : 05 PM

अनेक गोष्टी आपल्या आटोक्यात येणार्‍या नसतात. त्यांच्या कडे दुर्लक्ष करणे योग्य. आपल्या हातात जे काही आहे ते चांगल्या प्रकारे निभावून नेले पाहिजे.

By : Bhalchandra Shrikhande
14/05/2025 09 : 36 : 37 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article