कविता


कविता माझी रूसली
अन् कोपऱ्यात जाऊन बसली,
कळेना मज काही
चित्तात उदासी कसली?

किती तिला चुचकारले
तरी न ती खुलली,
किती सायास केले
तरी न ती भुलली!

मग उमजले मनांत,
समजले क्षणार्धात
उघडतां शब्दभांडार
डोळ्यात खुदकन् हसली!

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article