आस
आस
सांग ना ग नाव तुझे
गाव तुझे ठाव तुझे
हरलो मी हृदय आज
आसुसले चित्त असे
झालो मी बंदिवान
कमळात भृंग जसे
अवतरे मधुमास जरी
बहावा आरक्त हा
वसंतभूल चहूकडे
पण आज रिक्त मी
आस तुला बघण्याची
चाहूल तुझ्या असण्याची
सांग ना ग नाव तुझे
गाव तुझे ठाव तुझे



Comments